वसमत येथे मूक मोर्चाला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:35 AM2018-04-24T00:35:24+5:302018-04-24T00:35:24+5:30
लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ वसमत येथे सोमवारी मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनांसह परभणी येथे घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ वसमत येथे सोमवारी मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनांसह परभणी येथे घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
वसमत येथील गढी मोहल्ला भागातून सोमवारी सकाळी मूकमोर्चा काढण्यात आला. सर्वधर्मिय व सर्व पक्षीयांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मुकमोर्चात मोठा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गाने निघालेला मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात कठुआ, उन्नाव येथे घडलेल्या अत्याचारात सहभागी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. सोबतच दोन दिवसांपूर्वीच परभणी येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवून आरोपीविरोधात कारवाईची मागणी केली. अत्यंत शांततेत मूकमोर्चा पार पडला. मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चासाठी डीवायएसपी शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी मोठा चोख बंदोबस्त लावला होता.