हिंगोलीत भाजपाची जिल्हा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:32 AM2018-08-12T00:32:10+5:302018-08-12T00:33:04+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक क्रियाशील सभासदापर्यंत पोहोचून एक बुथ व २५ युथ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक क्रियाशील सभासदापर्यंत पोहोचून एक बुथ व २५ युथ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
भाजपचे राज्य सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खा.शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, बाबासाहेब जामगे, श्रीकांत देशपांडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुजितसिंह ठाकूर यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले. तर भाजपने सामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या. त्या योजनांसह त्याची माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, जिल्ह्यातील ९७१ बुथवर कमिट्यांची स्थापना झाली आहे. १ बुथ व १५ युथ ही संकल्पनाही अंमलात आणली आहे. आता या सर्वांच्या १ ते ५ सप्टेंबरदरम्यान जि.प. सर्कलवर बैठका घेण्यात येतील. तर ५ आॅक्टोबर ते २0 नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक तालुका स्तरावर बैठक घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भाजपचे १ लाख प्राथमिक सदस्य आहेत. त्या प्रत्येकाची पदाधिकाºयांमार्फत घरी जाऊन भेट घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.
यावेळी मिलींद यंबल, फुलाजी शिंदे, बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र शिंदे, गणेश बांगर, प्रकाश थोरात, सूर्यभान ढेंगळे, रामरतन शिंदे, सुरजितसिंह ठाकूर, अशोक ठेंगल, उत्तमराव जगताप, कैलास काबरा, प्रशांत सोनी, हमीद प्यारेवाले, आशिष वाजपेयी, मोतीराम इंगोले, शिवा घुगे, शंकर बोरुडे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.