पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:32 AM2018-12-25T00:32:02+5:302018-12-25T00:32:30+5:30

भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री दिलीप कांबळे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.

 Black flag shown to guardian minister | पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री दिलीप कांबळे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.
पालकमंत्री दिलीप कांबळे २४ डिसेंबर रोजी जिल्हा दौºयावर आले होते. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक आटोपून ते मार्गस्थ होत असताना भारिपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याचे विधान पालकमंत्री कांबळे यांनी काढल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भारिपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी पालकमंत्र्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करणाºया आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शासकीय विश्रामगृह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. यावेळी पक्ष निरीक्षक रवींद्र मोरे पाटील, जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, जिल्हा मुख्य संघटक रवींद्र वाढे, युवा जिल्हाध्यक्ष ज्योतीपाल रणवीर, रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे, रघुवीर हानवते, अतीकुर रहेमान, बबन भूक्तर, डॉ.वाघमारे, वर्षा मोरे, सुनंदा वाघमारे, सोमनाथ शेळके, रूपेश कदम व मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title:  Black flag shown to guardian minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.