रामनवमीनिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:08+5:302021-04-22T04:31:08+5:30
ऊस पिकाला पाणी देण्याचे आवाहन हिंगोली : ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी. उन्हाची तीव्रता ...
ऊस पिकाला पाणी देण्याचे आवाहन
हिंगोली : ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उसाला सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. ऊस पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ‘क्लोरपायरीफॉस’ २० टक्के २५ मिली किंवा ‘क्लोरॅट्रानोलीप्रोल’ १८.५ चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड पाहून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.
हळद काढणीचे काम सुरूच
हिंगोली : जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हळदीची लागवड उशिरा केली आहे. सध्या काही ठिकाणी हळद काढणी, उकडणी, वाळविणे, पॉलिश करणे सुरू आहे. वादळी वारे व पावसाचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी हळद काढणीचे काम वेगाने सुरू करावे. उन्हाची तीव्रता पाहता सकाळी हळद काढणी करून घ्यावी, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.