१५ जुलैला वसमत, हिंगोलीत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:21 AM2021-07-11T04:21:04+5:302021-07-11T04:21:04+5:30
हिंगोली / वसमत : लोकमत रक्ताचं नातं मोहिमेअंतर्गत वसमत व हिंगोली येथे १५ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर ...
हिंगोली / वसमत : लोकमत रक्ताचं नातं मोहिमेअंतर्गत वसमत व हिंगोली येथे १५ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लोकमत आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम आयोजित केला असून या रक्तदान महायज्ञात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
वसमत येथे लोकमत व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर गुरुवार, दि. १५ जुलै २०२१ रोजी सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत यावेळेत घेण्यात येणार आहे. रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढीचे पथक राहणार आहे. श्री बोधानंद मठ, ब्राह्मण गल्ली, वसमत येथे आयोजित या रक्तदान शिबिरासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक आनंद बडवणे, यश डहाळे, सिद्धेश्वर नरवणे, मनीषा कुलकर्णी, प्राजक्ता बडवणे, शिल्पा नरवणे, मारोती कुबडे, डॉ. धनंजय कंचले, डॉ. वैशाली डिग्रसे, ॲड. दीपक कट्टेकर, नकुल शिरपूरकर, चंद्रकांत देवणे, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील सदस्य पुढाकार घेत आहेत.
हिंगोलीतही रक्तदान
लोकमत व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत वरद नेत्रालय, टेहरे हॉस्पिटलची लाईन, एनटीसी हिंगोली येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे गजानन पोपळाईत, मोतीराम इंगोले, शिरीष गुंडेवार, महेश सरनाईक, आशिष पिंगळकर, श्याम कळमनुरीकर, गणेश गरड, संगीता चौधरी, उमेश मेटकर, डॉ. स्वाती गुंडेवार, डॉ. स्वाती पवार, डॉ. दीपाली धाडवे, लीना जाधव यांच्यासह लोकमत व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने केले आहे.