डॉक्टरभरतीत बोगस रहिवासी प्रमाणपत्रे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:49 AM2018-08-14T00:49:01+5:302018-08-14T00:49:43+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक उपकेंद्रावर एक बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया घेण्यात येत आहे. यामध्ये काहींनी गुणांकन वाढण्यासाठी बोगस रहिवासी प्रमाणपत्र काढून जोडले असून इतर काही प्रकार घडल्याची तक्रार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक उपकेंद्रावर एक बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया घेण्यात येत आहे. यामध्ये काहींनी गुणांकन वाढण्यासाठी बोगस रहिवासी प्रमाणपत्र काढून जोडले असून इतर काही प्रकार घडल्याची तक्रार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
याबाबत काही डॉक्टरांचे शिष्टमंडळ सीईओ एच.पी.तुम्मोड, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांना भेटले. त्यांनी आपले गाºहाणे प्रशासन व पदाधिकाºयांसमोर मांडले. मात्र यातील काही बाबींमध्ये शंकाचे निरसन प्रशासनाने केले आहे. काही बाबींमध्ये मात्र संबंधित उमेदवारांनी केलेला बनाव उघड झाला आहे. एकाच उमेदवाराने दोन तालुक्यांच्या ठिकाणी अर्ज केल्याने तो नेमका कोणत्या तालुक्याचा रहिवासी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर प्रशासनाने मात्र तहसीलचे रहिवासी प्रमाणपत्र असल्याने त्यांना याबाबतचे गुण दिल्याचे सांगितले. त्यामुळे तहसील प्रशासनाने केलेली ही चूक आहे की, प्रमाणपत्रच बोगस आहे, असा गंभीर प्रश्न समोर येत आहे.
या प्रकारात चौकशीअंती संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने मात्र यात योग्य ती चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.