बोधनापोड बाळापुरात, तर पाटील गोरेगाव पोलीस ठाण्यात कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:48+5:302021-08-22T04:32:48+5:30
हिंगोली : अवैध धंद्याचा कहर माजलेल्या आखाडा बाळापूर व गोरेगाव पोलीस ठाण्यात तात्पुरती बदली केलेल्या दोघांची कायम नियुक्ती मिळाली ...
हिंगोली : अवैध धंद्याचा कहर माजलेल्या आखाडा बाळापूर व गोरेगाव पोलीस ठाण्यात तात्पुरती बदली केलेल्या दोघांची कायम नियुक्ती मिळाली आहे. बाळापुरात पंढरीनाथ बोधनापोड, तर गोरेगावात श्रीदेवी पाटील यांना ठाणेदारपदी संधी मिळाली आहे. दोघेही वसमत शहर ठाण्यातून बदलीवर गेले.
हिंगोली शहर पाोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रेखा श्यामराव शहारे यांची हिंगोलीतील अर्ज शाखेत, फौजदार भाग्यश्री कांबळे यांची हिंगोली ग्रामीण येथून सायबर पोलीस ठाण्यात, स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार किशोर पोटे यांची हिंगोली ग्रामीण ठाण्यात, सेनगाव पोलीस ठाण्यातील अभय माकणे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. मागील काही दिवसांपासून कायम तक्रारींमुळे चर्चेत असलेल्या सेनगाव पोलीस ठाण्याला आता कळमनुरी येथील पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या रूपाने पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाचक फौजदार विश्वनाथ ढोले यांची अ. पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. हिंगोली शहर ठाण्यातील फौजदार नितीन केणेकर यांची कुरुंदा ठाण्यात, बाळापूर ठाण्यातील फौजदार अच्युत मुपडे यांची सेनगाव ठाण्यात, तर कळमनुरी ठाण्यातील फौजदार प्रतिभा शेट्टे यांची वसमत शहर ठाण्यात बदली झाली आहे.
जिल्ह्यात नव्याने काही पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकही आले आहेत. त्यामुळे यापैकी काही जणांना ठाणे मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आता असलेल्यांपैकी काहींचे ठाणे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन व जुन्यांपैकीही काहींचा डोळा आखाडा बाळापूर, हट्टा पोलीस ठाण्यावर आहे, तर काही बदल झालाच तर वसमत व हिंगोली शहराची संधी मिळते की काय? अशी अपेक्षाही काहीजण बाळगून आहेत.