विहिरी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला
By विजय पाटील | Published: September 28, 2023 05:25 PM2023-09-28T17:25:16+5:302023-09-28T17:25:40+5:30
कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता.
कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील सुकळी शिवारात कालव्या लगत एका विहिरीत 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह 28 सप्टेंबर रोजी आढळले असून सकाळपासून मृतदेह काढण्यासाठी दमछाक करावी लागली ,जवळपास 5 तासानंतर मृतदेह काढण्यास यश आले आहे. नेमके काय प्रकार आहे हे मात्र समजले नाही.या प्रकरणी दोन जणांची चौकशी करण्यात आली आहे.
कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता. त्या युवकाचा मृतदेह 28 सप्टेंबर रोजी सुकळी शिवारात कालव्यालगत शेत असलेल्या एका विहिरीत आढळून आला आहे.मृतदेह संशयास्पद स्थितीत विहिरीत होता,पाण्यातून मृतदेह काढण्यासाठी जवळपास 5 तास दमछाक करावे लागले त्यानंतर हा मृतदेह काढण्यास आले ,नेमके कशा प्रकारे या युवकाचा मृत्यु झाला याचा मात्र उलगडा झाला नव्हता.
त्यामुळे या प्रकरणी उलटसुलट चर्चा होत होती,शवविच्छेदनाच्या अहवालनंतर या प्रकरणी मुत्यु कसा झाला याचा उलगडा होईल.बेपत्ता युवकाचा मृतदेह आढल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी सहा पोलीस निरीक्षक गजानन मोरे,बिट जमादार बालाजी जोगदंड, पोलीस नायक प्रदीप साळूके आदिनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणी दोन जणांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे, युवकाला दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते.त्यामुळे या प्रकरणी कसून चौकशी पोलीस करीत आहेत.