हिंगोली जिल्ह्यात ६ शाळांत आढळले बोगस विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:13 AM2018-08-09T01:13:06+5:302018-08-09T01:13:43+5:30
राज्यात शाळातील विद्यार्थ्यांची विशेष पटपडताळणी मोहीम ३ ते ५ आॅक्टोबर २०११ मध्ये केली. या मोहिमेत बोगस पटसंख्या आढळून आलेल्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यादृष्टिने शिक्षण विभाग या शाळांची तपासणी करत आहे. तपासणीत शाळा दोषी आढळल्यावर त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : राज्यात शाळातील विद्यार्थ्यांची विशेष पटपडताळणी मोहीम ३ ते ५ आॅक्टोबर २०११ मध्ये केली. या मोहिमेत बोगस पटसंख्या आढळून आलेल्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यादृष्टिने शिक्षण विभाग या शाळांची तपासणी करत आहे. तपासणीत शाळा दोषी आढळल्यावर त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.
विशेष पटपडताळणी मोहिमेत जिल्ह्यातील सहा शाळेत बोगस विद्यार्थीसंख्या आढळून आली आहे. यात इंदिरा गांधी प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर, शारदा प्राथमिक शाळा कळमनुरी, जि.प.प्रा. शाळा गणेशवाडी, ता. कळमनुरी, जि.प. प्रा. शाळा साखरा तांडा, ता. सेनगाव, जि.प. प्रा. शाळा पवारवाडी, ता. सेनगाव व जि.प. प्रा. शाळा नवलगव्हाण, ता हिंगोली यांचा समावेश आहे. यात दोन खाजगी संस्थेच्या व ४ जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. कळमनुरी तालुक्यात तीन, सेनगाव दोन तर हिंगोली तालुक्यातील एक अशा एकूण सहा शाळेत बोगस विद्यार्थी पटसंख्या आढळून आली आहे. ७ आॅगस्टपासून तालुक्यातील इंदिरा गांधी प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर व शारदा प्राथमिक विद्यालय कळमनुरी या दोन शाळांची तपासणी सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी सध्या करू नका, असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे पातळे यांनी सांगितले. ७ आॅगस्ट रोजी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेची प्राथमिक तपासणी माध्यमिक चे शिक्षणाधिकारी डी.के.इंगोले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे, विस्तार अधिकारी बालाजी गोरे यांनी केली. यातील अहवाल अजून येणे बाकी आहे.
---
अनुदान लाटले : बनावट दाखविले विद्यार्थी
या शाळांनी शासनाचे अनुदान घेतले का? बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक, शालेय पोषण आहार अनुदान शाळा अनुदान शासनाचे विविध अनुदान उचलून बोगस पटसंख्या दाखवून शासनाची कशी फसवणूक केली. किती रकमेची शासनाची फसवणूक केली. आदींसह शाळेतील सर्व अभिलेख्यांची तपासणी करण्यात येत आहे. यात शाळा दोषी आढळल्यास संस्थाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकावर पोलिसांत गुन्हे दाखल होणार आहेत. हे गुन्हे १० आॅगस्टच्या आत करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.
---
१० आॅगस्ट रोजी होणार गुन्हे दाखल
तपासणीत दोन संस्थेच्या शाळा दोषी आढळल्यास त्यांची मान्यता रद्द होवून त्यांच्यावर पोलिसांत गुन्हेही दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील ४ जि.प. शाळांची तपासणी नंतर होणार आहे. राज्यातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी महसूल विभागामार्फत करण्यात आली. अधिकची पटसंख्या दाखवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ या शाळांनी घेतला होता. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखविणाºया शाळांचे धाबे दणाणले आहे. तपासणी या संस्थेच्या दोन्ही शाळा, दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर १० आॅगस्ट रोजी पोलिसांत गुन्हे दाखल होणार आहेत.