ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी वापरले बहिष्कारासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:35+5:302021-01-10T04:22:35+5:30
मिनी ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. गत विधानसभा निवडणुकीत वसमत तालुक्यातील भोरीपगाव येथील नारिकांनी नवीन वस्त्यांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. ...
मिनी ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. गत विधानसभा निवडणुकीत वसमत तालुक्यातील भोरीपगाव येथील नारिकांनी नवीन वस्त्यांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. पाण्याची व्यवस्था नाही म्हणून बहिष्कार टाकला होता. कळमनुरी तालुक्यातील करवाडी ते नांदापूर हा रस्ता पावसाळ्यात डोकेदुखी ठरतो. पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यासाठी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता.
आजही नागरिकांच्या समस्या सोडविल्या नाहीत. या वेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत बळसोंडच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला असून, जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत दोन गावांनी टाकला होता बहिष्कार
वसमत तालुक्यातील भोरीपगाव व कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. भोरीपगाव येथील अनेक वस्त्यांमध्ये कोणतीच सुविधा मिळत नाही. अनेक समस्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. या संदर्भात त्रास जाऊन रहिवाशांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते.
१५ वर्षांपासून सुविधाच नाही; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
गत पंधरा वर्षांपासून हिंगोली लगत असलेल्या बळसोंड येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सुविधा नसल्यामुळे रहिवाशांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. सुविधा करून द्याव्यात, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला निवदेनही दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बळसोंड येथे मागील काही दिवसांपासून पाण्याचे नळ नाहीत, विजेची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहे. त्याचबरोबर रस्ते नाहीत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो. यासाठी अनेक वेळा अर्ज-विनंतीही केल्या आहेत. परंतु, कोणीही लक्ष दिलेले नाही.
- प्रल्हाद दराडे, भारतनगर, बळसोंड
आनंदनगरामध्ये हातपंपाची व्यवस्था नाही. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी येथील महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागरमोर्चाही काढला होता. अजूनही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली नाही. सुविधाही येथे नाहीत.
-राजू पवार, आनंदनगर, बळसोंड