परीक्षेवर बहिष्कार टाकणार मुक्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:39 AM2017-12-20T00:39:13+5:302017-12-20T00:40:50+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी शासनाशी लढा देत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आता २ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला असून तरीही शासनाने दखल न घेतल्यास बारावीच्या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्काराचा इशारा दिला आहे.

Boycott test | परीक्षेवर बहिष्कार टाकणार मुक्टा

परीक्षेवर बहिष्कार टाकणार मुक्टा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिका-यांना निवेदन : तीन वर्षांपासून सुरू आहे लढा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी शासनाशी लढा देत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आता २ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला असून तरीही शासनाने दखल न घेतल्यास बारावीच्या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्काराचा इशारा दिला आहे.
मागील तीन वर्षांपासून मुक्टा संघटनेकडून शासनासह प्रशासनाला विविध मागण्यांसाठी निवेदने दिली जात आहेत. मात्र अद्याप या संघटनेच्या मागण्यांचा विचार झाला नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. २0१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता देण्याचे व इतर मागण्यांच्या अंमलबजावणीचे आश्वासनही अधिकाºयांनी पाळले नाही. तर उलट २३ आॅक्टोबरला वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचा अन्यायकारक आदेश काढल्याचा आरोपही या संघटनेकडून करण्यात आला आहे.२00५ नंतरच्या शिक्षकांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करा, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्या, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी द्यावी, ११ वीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम तीन फेºया अनुदानितच्याच कराव्यात, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा कराव्या, शिक्षणसेवक योजना रद्द करणे, तोपर्यंत मानधन दुप्पट करावे, यापूर्वी नियुक्त शिक्षकांना अभियोग्यता चाचणीस सुट द्यावी, नीट, जेईईसाठी प्रत्येक जिल्ह्याला केंद्र असावे, सेवानिवृत्तीचे वय ६0 करा, अशैक्षणिक कामे देवू नका, सहाव्या वेतन आयोगाचा फरक द्या आदी मागण्या आहेत.

Web Title: Boycott test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.