वारंगा फाटा येथे धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:25 PM2018-07-12T23:25:01+5:302018-07-12T23:25:21+5:30

 The brave theft at Waranga Phata | वारंगा फाटा येथे धाडसी चोरी

वारंगा फाटा येथे धाडसी चोरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील कापड दुकान फोडून रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा चोरट्यांनी लंपास केला. ११ जुलै मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नियमित प्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेल्या दुकान मालकास चोरी झाल्याचे समजले. भरवस्तीत दुकान असून शिवाय हाकेच्या अंतरावरच पोलीस मदत केंद्र आहे. तरीसुद्धा याठिकाणी धाडसी चोरी झाल्याने एकच चर्चा होत आहे.
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील मदन श्रीराम वायकोळे यांच्या यश ड्रेसेस कापड दुकानाचे मागील बाजूने असलेले बांधकाम चोरट्यांनी फोडले. व आतील लोखंडी दरवाजा तोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. दुकानातील पैसे ठेवण्याच्या पेटीचे कुलूप तोडून १६ हजार ७९० रूपये रोख व दुकानातील जीन्स पँट, शर्ट व इतर कपडे १ लाख ७८ हजार ९१ रूपये असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घटनेची माहिती मिळताच आखाडाबाळापूर पोलीस ठाण्याचे पोनि व्ही. एम. केंद्रे, अशोक कांबळे आदींनी भेट देऊन पाहणी केली. फिर्याद देण्यासाठी गेलेल्या दुकानमालकाचा मात्र केवळ लेखी तक्रार अर्ज घेण्यात आला. चोरट्यांवर गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी अर्जच घेतला आहे. दरम्यान, वारंगा फाटा येथे दुकान, पानटपरी आणि ईतर ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरू आहेच. परंतु अद्याप एकाही चोरीचा तपास पोलिसांना लागला नाही. विशेष म्हणजे काही चोºयांची नोंदच झाली नाही. परंतु आता या धाडसी चोरीची सर्वत्र चर्चा असून चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानच आहे.

Web Title:  The brave theft at Waranga Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.