नियम डावलून विवाह सोहळा लावणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:41+5:302021-06-01T04:22:41+5:30

औंढा तालुक्यातील शिरड शहापूर येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून, कोणतीही परवानगी घेतली नाही, तसेच नियमांचे पालन न ...

Breaking the rules and arranging a wedding ceremony is expensive | नियम डावलून विवाह सोहळा लावणे पडले महागात

नियम डावलून विवाह सोहळा लावणे पडले महागात

Next

औंढा तालुक्यातील शिरड शहापूर येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून, कोणतीही परवानगी घेतली नाही, तसेच नियमांचे पालन न करता शेकडो लोक एकत्र आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना मिळाली होती. त्यावरून कुरुंदा ठाण्याचे सपोनि सुनील गाेपीनवार, स्थागुशाचे फौजदार एस.एस. घेवारे, सविता बोधनकर, तलाठी गोपाल मुकीर आदींच्या पथकाला विवाहस्थळी पाठविले. यावेळी कोरोना नियमांचे पालन न करता विवाह सोहळा पार पडत असल्याचे दिसून आले. त्यावरून कुरुंदा पोलीस ठाण्यात सय्यद मुजीब शेख अमीर, सय्यद अन्वर सय्यद रज्जाक, सय्यद असीम सय्यद शबीर, सय्यद जावेद सय्यद मुज्जू (सर्व रा. शिरड शहापूर), सय्यद माजीद शेख नजीर (रा. वसमत), सय्यद शोयब सय्यद नसीम, सय्यद रुकसाना सयद मन्नान, फेरोजखान सिकंदर खान पठाण, समीर खान जब्बारखान पठाण, सद्दाम खान सिकंदरखान पठाण (सर्व रा. शिरड शहापूर), अफरोज खान सिकंदर खान पठाण, मुर्तुजा काझी (रा. वसमत), शेख शफियोद्दीन जे.के. टेंट हाऊस शिरड शहापूर यांच्यासह १५० ते २०० लोकांवर कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, यातील १० जणांना अटक केली असून, उर्वरित फरार झाले आहेत. व्हिडिओ चित्रीकरण व फोटोच्या माध्यमातून उर्वरित लोकांचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी वसीम हाश्मी, पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील गोपीनवार, पोउपनि. एस.एस. घेवारे, के.डी. पोटे, सुनीता बोधनकर, सपोउपनि बालाजी बोके, पोना. विशाल घोळवे, राजू ठाकूर, शंकर ठोंबरे, विठ्ठल काळे, शेख जावेद, प्रशांत वाघमारे, पोना. सिद्दीकी यांच्या पथकाने केली.

Web Title: Breaking the rules and arranging a wedding ceremony is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.