पुलाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:26+5:302021-01-10T04:22:26+5:30

राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे वातावरण बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावाजवळून होणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर ...

Bridge work at a snail's pace | पुलाचे काम कासवगतीने

पुलाचे काम कासवगतीने

Next

राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे वातावरण

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावाजवळून होणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर नेहमी धूळ राहत असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास होत आहे. याचबरोबर सदरील धूळ ही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पिकांवर जमा होत असल्याने याचा परिणाम पिकांवर पडू लागला आहे. यासाठी शेतकरी चिंतातुर झाला आहे.

गावातून भरधाव वेगाने धावणारी वाहने वाढली

संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गाव हे औंढा नागनाथकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गाव आहे. गावासमोरील रस्त्यावरून औंढा, परभणी, वसमतकडे जाणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पण या मार्गावरून जाणारी वाहने भरधावाने धावत धावत असून याचा नाहक त्रास गावकऱ्यांना होत आहे. अनेकदा गावकऱ्यांना रस्त्यावरूच चलताना तसेच रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाचा धक्का लागण्याचे प्रकार घडले आहे. यासाठी गावाच्या जवळपास गतिरोधक बसवून या वाहनांच्या वेगावर आळा घालण्याची मागणी होत आहे.

बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

औंढा नागनाथ : कधी ढगाळ तर कधी ऊन असे वातावरण मागील आठवडाभरापासून होत आहे. याचा परिणाम तालुक्यातील बालकांसह वयोवृद्धांवर पडत आहे. वातावरणात बदल होत असल्याने लहान बालकांना ताप, खोकला, हिवताप तर वयोवृद्धांना दमा, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास उदभवत आहे. वातावरणाच्या बदलामुळे अनेक रुग्णालयात रुग्णांची संख्याही वाढली आहे.

बोअर व विहिरीच्या पाणी पातळीत घट

कळमनुरी : तालुक्यातील अनेक गावातील विहीरी व बोअरचे पाणी आटत असून गावकऱ्यांना हिवाळ्याचत पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. बऱ्याच गावांतील विहिरी व बोअरचे पाणी आटल्याने गावकरी पाण्यासाठी शेतशिवारातील विद्युत मोटार व विहिरीच्या ठिकाणी धाव घेत आहे. हिवाळ्यातच पाण्यासाठी गावकरी भटकत असून यापुढे पाणीटंचाई प्रश्न गंभीर बनणार अशी चिंता गावकऱ्यांना लागली आहे.

वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला

साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावाच्या शेतशिवारात वन्य प्राणी घुसण्याचे प्रकार वाढले आहे. रात्रीच्या वेळी रानडुकर, रोही शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहे. याचबरोबर सकाळी सकाळी वानरांची टोळी शेतातील पिकांवर उड्या मारून जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

रस्त्यातील खड्ड्यांमध्ये घाण पाणी साचले

हिंगोली : शहरातील शाहू नगर ते कमला नगर या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहे. या रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यात मागील अनेक दिवसांपासून नळ पाइपलाइनचे लिकेज झालेले पाणी साचले आहे. या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनधारकांना आपली वाहने चालविताना मोठा त्रास होत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यासह घाण पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नगरवासीयांतून होत आहे.

Web Title: Bridge work at a snail's pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.