बीएसएनएलचा मनोरा कोसळून चार घरांचे नुकसान, एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 10:03 PM2019-04-16T22:03:19+5:302019-04-16T22:19:21+5:30
सेनगाव येथील धोकदायक बनलेला बीएसएनएलचा मनोरा १६ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वादळी वा-यामुळे कोसळला.
हिंगोली - सेनगाव येथील धोकदायक बनलेला बीएसएनएलचा मनोरा १६ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वादळी वा-यामुळे कोसळला. मनो-याखाली चार घरे दबून एकजण गंभीर जखमी झाला. तर घरातील आठ जणांना सुखरूप बाहेर काढता आले. या दुर्घटनेत मात्र सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
सेनगाव येथील जुने ग्रामीण रूग्णालय, कृउबा परिसरातील बिएसएनएलचा सर्वांत मोठा असलेला २५० फुटाचा धोकदायक मनोरा मंगळवारी वादळी वा-यात कोसळल्याची दुर्घटना घडली. या मनोºयाखाली चार घरे दबल्या गेली. या अपघातात अशोक कांबळे नावाचा इसम गंभीर जखमी झाल्याने त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तर दबलेल्या इतर आठ जणांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या दुघटनेत जनावरेही दबली गेली.
हा मनोरा जुन्या ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने पडला. मागील अनेक वर्षांपासून धोकदायक मनो-याची साधी दुरूस्तीही करण्यात आली नव्हती. शिवाय मनो-याच्या दुरूस्तीसाठी नागरिकांनी याबाबत नगरपंचयात, तहसील कार्यालय व हिंगोली येथील बिएसएनएलच्या कार्यालयात लेखी कळविले होते. परंतु नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर मंगळवारी झालेल्या वादळी वाºयात मनोरा कोसळला. घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी बीएसएनएलच्या कर्मचा-यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय एक तास उलटूनही प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी उशिरापर्यंत पोहचली नव्हती हे विशेष. मनो-याखाली अशोक कांबळे, सुनील रणबावळे, दीपक आठवले व अन्य एकजन एकूण चौघांची घरे दबली गेली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.