बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:33 AM2021-08-24T04:33:29+5:302021-08-24T04:33:29+5:30
कोरोना महामारीचे नियम पाळत खरमुरे व इतर साहित्यांची विक्री करावी लागते. कोरोनाआधी दोनशे ते अडीचशे रुपये पदरात पडायचे. ...
कोरोना महामारीचे नियम पाळत खरमुरे व इतर साहित्यांची विक्री करावी लागते. कोरोनाआधी दोनशे ते अडीचशे रुपये पदरात पडायचे. २३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र कहर केला. कोरोनामुळे संसाराचा गाडा पूर्णपणे विस्कटला आहे. कोरोनामुळे आजमितीस लांब पल्ल्यांच्या बसेस तेवढ्याच सुरू आहेत. ग्रामीण भाग अजूनही सुरु झाला नाही. ग्रामीण भागातील बसेस सुरू झाल्या तर पोटापुरते पैसे मिळतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील बसेसची प्रतीक्षा
कोरोना महामारी पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. रोज एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. लांब पल्ल्यांच्या बसेस केवळ सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रवासी म्हणावे तेवढे शहराच्या ठिकाणी येत नाहीत. सणावाराच्या दिवशी ग्रामीण भागातील प्रवासी येतात. एरव्ही कमीच प्रवासी येत आहेत.
खरमुरे, फुटाणे विकून पोट भरतो...
हिंगोलीच्या बसस्थानकात चार विक्रेते आजमितीस खरमुरे, चिप्स, गोळ्या, फुटाणे, बिस्कीट व इतर साहित्यांची विक्री करून संसाराचा गाडा चालवितात. दिवसाकाठी त्यांना शंभर रुपये पदरात पडतात. संसाराचा गाडा चालविण्यासाठी सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील बसेस कधी सुरू होतात याची प्रतीक्षा करीत आहेत.
ग्रामीण भाग वगळता लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू
कोरोना महामारी अजून पूर्णपणे संपलेली नसल्यामुळे अजूनही ग्रामीण भागातील बसेस सुरू झाल्या नाहीत. सद्यस्थितीत ४७ बसेस हिंगोली आगारातून सुरू आहेत. शासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागातील बसेस सुरू करता येतील.
-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली आगार