बस, रेल्वे रिकाम्याचं ; प्रवासी घरातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:41+5:302021-06-09T04:37:41+5:30

आजमितीस तरी कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांविनाच महामंडळाच्या बसेस, रेल्वे रिकाम्याच जात आहेत. दुसरीकडे पुढे चालून कोरोना रुग्णात वाढ होऊ ...

Bus, train empty; Travelers at home! | बस, रेल्वे रिकाम्याचं ; प्रवासी घरातच !

बस, रेल्वे रिकाम्याचं ; प्रवासी घरातच !

Next

आजमितीस तरी कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांविनाच महामंडळाच्या बसेस, रेल्वे रिकाम्याच जात आहेत. दुसरीकडे पुढे चालून कोरोना रुग्णात वाढ होऊ नये म्हणून महामंडळ व रेल्वे विभागाने कोरोना नियम कडक केले आहेत. प्रवाशांना मास्क असेल तर प्रवेश द्यावा, अशा सूचना संबंधित चालक व वाहकांना दिल्या आहेत.

एस. टी. महामंडळाने पर जिल्ह्यांसाठी बसेस सुरू केल्या आहेत. यामध्ये अकोला, वाशिम, शेगाव, जळगाव, औरंगाबाद, परभणी, नांदेड, नाशिक या लांबपल्ल्याच्या बसेसचा समावेश आहे. दुसरीकडे रेल्वे विभागानेही प्रवासी संख्येत अजून तरी वाढ झाली नसल्याचे सांगितले आहे. इंटरसिटी या रेल्वे गाडीलाही अजून तरी प्रवासी मिळेनासे झाले आहेत. जयपूर -सिकंदराबाद, हैदराबाद- जयपूर, नांदेड - गंगानगर, नांदेड - जम्मूतावी या रेल्वे सध्या सुरू आहेत.

प्रतिक्रिया

दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यामुळे बसेस बंद केल्या होत्या. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. महामंडळाने बहुतांश ठिकाणच्या बसेस सुरु केल्या आहेत, मात्र प्रवाशांना मास्क बंधनकारक केला आहे.

- संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून रेल्वे विभागाने काही रेल्वे बंद केल्या आहेत. आजमितीस ५ रेल्वे गाड्या सुरु आहेत. कोरोना ओसरु लागला असला तरी, प्रवासी संख्या मात्र म्हणावी तेवढी मिळत नाही. प्रवासी अजूनही घरातच आहेत.

- रामसिंग, स्टेशनमास्टर, हिंगोली

Web Title: Bus, train empty; Travelers at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.