कडब्याच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:01 AM2019-04-11T00:01:14+5:302019-04-11T00:01:33+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीकाठी असलेल्या नालेगाव येथे १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतातील कडब्याच्या गंजीला अचानक आग लागल्याची घटना घडली.
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीकाठी असलेल्या नालेगाव येथे १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतातील कडब्याच्या गंजीला अचानक आग लागल्याची घटना घडली.
आगीत अंदाजे तेराशेच्या जवळपास पेंढया जळून खाक झाल्या आहेत. नालेगाव शिवारात पूर्णा नदीच्या काठी श्रीराम पांडुरंग आहेर यांचे शेत असून त्यांच्या शेतात आखाड्याजवळ कडब्याच्या गंजीला अचानक आग लागून पेंढ्या जळाल्याने या दुर्घटनेत अंदाजे ३० हजारांचे नुकसान झाले. परिसरातील गवतानेही पेट घेतला होता. आग विझविण्यासाठी ग्रामस्थ धडपडत होते. पण जवळपास पाणीच उपलब्ध नव्हते. गावातही तीव्र पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीतही मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणून देण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. नालेगाव येथील पोलीस पाटील वसंतराव आहेर यांनी बाहेरून पाण्याचे टँकर मागविले. त्यानंतर आग आगीवर नियंत्रण मिळविता आले. शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. अन् त्यात ही दुर्घटना घडली.