दोन सिमेंट रस्त्यांचे प्रस्ताव मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:12 PM2018-08-30T23:12:56+5:302018-08-30T23:13:11+5:30
मतदारसंघात साखरा व गोरेगावसाठी सिमेंट रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचा आदेश नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मतदारसंघात साखरा व गोरेगावसाठी सिमेंट रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचा आदेश नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे.
साखरा-जयपूर-पानकनेरगाव या रस्त्यासाठी जवळपास १.४0 कोटी तर हराळ-वरखेडा-केंद्रा-माळहिवरा या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी १.७५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून या रस्त्यांना विशेष मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली होती.
या पत्रावर कारवाई करण्यास मंत्री पाटील यांनी अभिप्रायात म्हटल्याने रस्ते विभागाचे अवर सचिव सु.वि.करमकर यांनी नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यांना तसे पत्र देवून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
रस्त्याचा त्रास
हिंगोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गिट्टीमुळे ये-जा करणाºयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नव्यानेच झालेला हा रस्ता जागोजाग खचल्याने ही गिट्टी टाकली. तीच त्रासदायक बनली आहे.