वाहनावरील प्रलंबित दंड भरण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:44+5:302021-09-19T04:30:44+5:30
जिल्ह्यात हजारो वाहनांवर कोट्यवधींचा दंड प्रलंबित आहे. ज्या वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केला आहे. ...
जिल्ह्यात हजारो वाहनांवर कोट्यवधींचा दंड प्रलंबित आहे. ज्या वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केला आहे. मात्र, तो दांड अर्थात चलन अद्याप अदा केले नाही, त्यांच्याविरुद्धचे खटले विधि सेवा प्राधिकरणाच्या क.१९(५) अन्वये दाखलपूर्व खटला म्हणून अंतिम निवाड्याकरिता लोकअदालतीकडे पाठविणे उपयुक्त वाटते, असे पोलीस अधीक्षकांनी म्हटले. त्यानुसार २५ सप्टेंबरला ती जिल्हा न्यायालयात लोक अदालतीत सादर केली जाणार आहेत. त्यामुळे वाहनावर मोटार वाहन कायद्यान्वये अनपेड चलन केल्यानंतर जे चलन भरणे अद्याप प्रलंबित आहे, त्या वाहनधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसवरील लिंकवरून अथवा कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन ही रक्कम भरायची आहे. अन्यथा गणवेशातील कोणत्याही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे एटीएमद्वारे स्वाईप करून अथवा रोखीनेही चलन भरता येणार आहे. शहर वाहतूक शाखा, इंदिरा चौक हिंगोली येथेही सकाळी ८ ते रात्री २० या वेळेत चलन भरण्यासाठीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
महाट्राफिक ॲपवरही व्यवस्था
अँड्राॅईड मोबाईलमध्ये आर.टी.ओ नावाचे ॲप डाऊनलोड करून चलन तपासा या ऑप्शनवर वाहनाचा क्रमांक टाकल्यास चलनाची माहिती मिळते. त्याचबरोबर महा ट्राफिक ॲपचाही वापर करून चलन तपासून ते भरता येते.