ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उपसरपंचाचे सदस्यतत्व रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:43 PM2022-03-21T16:43:32+5:302022-03-21T16:44:10+5:30
२५ बाय ४० जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून कच्चे बांधकाम केले होते.
कुरुंदा (हिंगोली ) : वसमत तालुक्यातील कोठारी येथील उपसरपंच रघुनाथ नरवाडे यांनी ग्रामपंचायतच्या पडीत जमिनीवर अतिक्रमण केले हाेते. याप्रकरणी ग्रा. प. सदस्यांनी तक्रार केल्यानंतर चाैकशीअंती त्यांचे सदस्यतत्व रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र अधिनियम १९५८ च्या कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
कोठारी येथील उपसरपंच रघुनाथ नरवाडे यांनी ग्रामपंचायतच्या पडीत जागा मालमत्ता क्रमांक ३६ मध्ये २५ बाय ४० जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून कच्चे बांधकाम केले. तसेच त्याठिकाणी बोअरवेल घेतला. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य लोभाजी नरवाडे यांनी जिल्हाप्रशासनाकडे तक्रार केली होती.
तक्रारीनंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकुण घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदाराचा अर्ज मंजूर करून गैरअर्जदार उपसरपंच रघुनाथ नरवाडे यांचे सदस्यपद रद्द करण्याचे आदेश, महाराष्ट्र अधिनियम १९५८ च्या कलम नुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.