उमेदवारासाठी, खर्चमर्यादा, २५, ते ५० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:22+5:302021-01-08T05:38:22+5:30

उमेदवारांना दैनंदिन खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागत आहे. तालुक्यात १०९ ग्रामपंचायतच्या ८७५ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. काही गावे ...

For candidate, cost limit, 25, 50 thousand | उमेदवारासाठी, खर्चमर्यादा, २५, ते ५० हजार

उमेदवारासाठी, खर्चमर्यादा, २५, ते ५० हजार

Next

उमेदवारांना दैनंदिन खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागत आहे. तालुक्यात १०९ ग्रामपंचायतच्या ८७५ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. काही गावे बिनविरोध तर काही वार्ड बिनविरोध निवडून आलेले आहेत. १०९ ग्रामपंचायतीसाठी ३३८ प्रभाग आहेत. ग्रामपंचायतच्या राखीव जागेवर उभे राहणाऱ्याना मागासवर्गीय उमेदवारांना १०० रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या नंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. मतपत्रिकांचा रंग अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा व खुल्या प्रवर्गासाठी मतपत्रिकांचा रंग पांढरा राहणार आहे.

एका उमेदवारास एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नाम निर्देशन पत्र भरण्याची मुभा होती प्रत्येक स्वतंत्र जागेसाठी वेगवेगळी अनामत रक्कम नाम निर्देशन पत्र भरणाऱ्या उमेदवारांना भरावी लागली. एका उमेदवारास एका प्रभागात केवळ एका जागेसाठी निवडणूक लढविता येणार आहे.

Web Title: For candidate, cost limit, 25, 50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.