हिंगोली जिल्ह्यात 'गांजा'युक्त शिवार; औंढा, वसमतपाठोपाठ आता सेनगाव तालुक्यातही गांजाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:39 PM2020-09-16T13:39:18+5:302020-09-16T13:39:49+5:30

गुन्हे शाखेच्या कारवाईत ८७ हजार ५00 रुपयांचा गांजा जप्त

Cannabis-rich Shivar in Hingoli district; Following Aundha and Wasmat, now cannabis is also cultivated in Sengaon taluka | हिंगोली जिल्ह्यात 'गांजा'युक्त शिवार; औंढा, वसमतपाठोपाठ आता सेनगाव तालुक्यातही गांजाची लागवड

हिंगोली जिल्ह्यात 'गांजा'युक्त शिवार; औंढा, वसमतपाठोपाठ आता सेनगाव तालुक्यातही गांजाची लागवड

Next
ठळक मुद्देगत आठ दिवसांत पोलिसांनी तिसरा छापा टाकत गांजा जप्त केला.औंढा तालुक्यात होमगार्डनेच गांजाची शेती केल्याचे आढळले होते

हिंगोली : औंढा, वसमतपाठोपाठ आता सेनगाव तालुक्यातही शेतात गांजाची लागवड झाल्याचे आढळले आहे. वरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात झाडे आढळली असून, ८७ हजार ५00 रुपयांचा गांजा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विशेष म्हणजे हळदीच्या पिकात गांजाची झाडी आढळली आहेत.

सेनगाव तालुक्यातील वरखेडा शेत शिवारातील गट क्रमांक २७१ चे शेतमालक दगडू लक्ष्मण पडघन यांचा मुलगा मिलींद दगडू पडघन (४0) याने आपले शेतातील हळदीच्या पिकामध्ये गांजाची एकूण ३६ लहान मोठी झाडे अवैधरीत्या लागवड केल्याचे आढळून आले आहे.  सदर झांडांचे एकूण वजन साडेसतरा किलो आहे. त्याची किंमत ८७ हजार ५00 रुपये एवढी होते.   गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार , फौजदार शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, ज्ञानेश्वर सावळे, चालक संदीप खरबळ यांनी केली.

तिसरा छापा
गत आठ दिवसांत पोलिसांनी तिसरा छापा टाकत गांजा जप्त केला. पहिल्या दिवशी औंढा तालुक्यातील तीन, तर वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजा आढळला. औंढा तालुक्यात होमगार्डनेच गांजाची शेती केल्याचे आढळले. सेनगाव तालुक्यातील शेतातही पोलिसांनी गांजा जप्त केला.

Web Title: Cannabis-rich Shivar in Hingoli district; Following Aundha and Wasmat, now cannabis is also cultivated in Sengaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.