कार-दुचाकी अपघात; एक ठार एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:24 AM2018-04-09T00:24:19+5:302018-04-09T00:24:19+5:30
भरधाव वेगाने कारणे दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे, ही घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता परभणी- औंढा राज्य महामार्गावर जिंतूर फाट्याजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : भरधाव वेगाने कारणे दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे, ही घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता परभणी- औंढा राज्य महामार्गावर जिंतूर फाट्याजवळ घडली.
अपघाता मधील मयत हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथील शामराव मोरे (५०) असून दुसरे जखमी डिग्रस कºहाळे येथील तुकाराम परसराम कºहाळे (३०) आहेत. हे दोघे शेतीसाठी बैल खरेदी करण्यासाठी दुचाकी क्र. एम.एच. ३८- एस. ७४०५ ने जवळा बाजार येथे आले होते.
परत गावाकडे जात असतानाच जिंतूर औंढा टी पॉईंट च्या पुढे भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या वेळी लगेच अन्य वाटसरूंनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना तात्काळ औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव कांबळे यांनी तपासणी करुन शामराव मोरे यांना मृत घोषित केले. तर जखमींवर उपचार सुरू आहेत. पोनि कुंदणकुमार वाघमारे त्या कारचा तपास करीत आहेत. अजून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. या ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे वाहनांना रस्त्याचा अंदाज आला नाही. शिवाय येथे दोन्हीही बाजूंंना बांधकाम सुरु असल्याचे फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटना वाढत आहेत. असाच हा भयंकर अपघात झाला. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील काम वेळीच पूर्ण करण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे.