कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:19 AM2018-11-26T00:19:57+5:302018-11-26T00:20:12+5:30
शहरालगतच्या अकोला बायपास परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरालगतच्या अकोला बायपास परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहर परिसरातील बळसोंड भागातील बायपास येथून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे दोन वाहन शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक व त्यांच्या सहकार्यांनी पकडले. यावेळी वाहनात जनावरे कोंबून ठेवण्यात आले होते. एक पिकअप हिंगोली ग्रामीण ठाण्यात आणुन उभे करण्यात आले आहे. यात ८ जनांवरे होती. तर दुसऱ्या वाहनांतही सात ते आठ जनांवरे होती. परंतु एक वाहनचालक पळून गेला आहे. पकडण्यात आलेले पिकअप ठाण्यासमोर उभे करून अशोक नाईक फिर्याद देत होते. यावेळी वाहन क्रमांक एचएच-३०-एबी-७२ चा चालकही फरार झाला. याप्रकरणी दोन्ही चालकाविरूद्ध अशोक नाईक यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना आर. एस. हरकाळ करीत आहेत.
कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारे वाहने अशोक नाईक, गणेश शिंदे, राजू आमुलवार, गोपाल अग्रवाल, दीपक डोरले, भुसांडे आदींनी पकडली. गुरांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे. बायपास परिसरातून कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहने पकडण्यात आल्याने जनावरांना जीवदान मिळाले.