काेरोनाने सहा जणांचा मृत्यू; नव्याने ३३९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:21+5:302021-04-23T04:32:21+5:30
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरातील १०० रुग्ण आढळून आले आहेत, तसेच वसमत येथे ६०, औंढा येथे २२, कळमनुरी येथे ३७, ...
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरातील १०० रुग्ण आढळून आले आहेत, तसेच वसमत येथे ६०, औंढा येथे २२, कळमनुरी येथे ३७, तर सेनगाव येथे १४ रुग्ण, असे एकूण २३३ रुग्ण बाधित आढळले आहेत.
गुरुवारी २४० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातून ९७, लिंबाळा ३७, वसमत ४४, कळमनुरी ३१, औंढा १५, असे रुग्ण घरी सोडले आहेत.
गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हिंगोली येथे लोहरा येथील ८५ वर्षीय पुरुष, वडचुना येथील ६० वर्षीय महिला, रिसाला बाजारातील ६३ वर्षीय पुरुष, तर कळमनुरी तालुक्यातील कुपटी येथील ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. नवीन कोविड सेंटर हिंगोली येथील साईनगर येथील ७५ वर्षीय पुरुष व गांगलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ४१२ असून, यामध्ये ३७० जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे ते ऑक्सिजनवर आहेत, तर ४२ रुग्ण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.
गुरुवारपर्यंत एकूण ११,०१७ रुग्ण आढळले. यापैकी ९,४१० रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला १,४३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.