वाहक -चालकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:52 AM2018-04-30T00:52:30+5:302018-04-30T00:52:30+5:30
दिवसेंदिवस वाढता कामाचा ताण, अन् त्यात अपुऱ्या कर्मचाºयामुळे राज्य परिवहन महामंडळातील वाहक -चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवसेंदिवस वाढता कामाचा ताण, अन् त्यात अपुऱ्या कर्मचाºयामुळे राज्य परिवहन महामंडळातील वाहक -चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दरवर्षी आगारातर्फे कार्यरत वाहक व चालकांची आरोग्य तपासणी करून पुढील वैद्यकीय उपचार दिले जातात.
हिंगोली आगारातील चाळिशी ओलांडलेल्या ५५ एसटी वाहक - चालकांची नेत्रविकार तज्ज्ञ व ह्दयविकार तज्ज्ञाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान १५ टक्के कर्मचाºयांना ह्दयविकार असल्याचे आढळून आले. तर डोळ्यांचे आजार असलेल्यांना चष्म्याचे नंबर बदलून घेण्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर इतर कर्मचाºयांना पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांनी दिली. यावेळी आगारातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.