वीजमीटर चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:55 PM2018-05-26T23:55:20+5:302018-05-26T23:55:20+5:30

येथील महावितरण कंपनीने कालपर्यंत वीजचोरीच्या ट्रॅकवर धावणाऱ्या प्रकरणात मीटरच चोरीचा गुन्हा दाखल केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण दडपण्याची तयार असताना ‘लोकमत’ ने केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवारी रात्री उशिराने सहायक अभियंता सपना वेदपाठक यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

 In the case of theft of thief | वीजमीटर चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

वीजमीटर चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील महावितरण कंपनीने कालपर्यंत वीजचोरीच्या ट्रॅकवर धावणाऱ्या प्रकरणात मीटरच चोरीचा गुन्हा दाखल केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण दडपण्याची तयार असताना ‘लोकमत’ ने केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवारी रात्री उशिराने सहायक अभियंता सपना वेदपाठक यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
माधव चांदणे व दीपक घुगे अशी आरोपींची नावे आहेत. हिंगोलीत गांधी चौक परिसरातील एस. के. फॅशन या कपड्याच्या दुकानासमोर १४४७४००० या क्रमांकाचे लावलेले साडेतीन हजार रुपये किमतीचे मीटर चोरी गेले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. येथील मीटर अचानक गायब झाल्याचे आधी सांगितले जात होते. तर वीजचोरीच्या दिशेने तपास केला जात होता. त्यामुळे अजून तरी यातील खरा प्रकार समोर आला नाही. रामलीला मैदानावरीलही एका दुकानात स्वत: अधीक्षक अभियंत्यांनी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही हे प्रकरण अजूनही थंड बस्त्यातच आहे. मात्र एक तृतियांश वेतन कपात सुरु असले तरीही अधीक्षक अभियंता शिस्तभंगाची कारवाई करणार होते. ती कारवाई काही अजून झालेली नसल्याचे चित्र आहे.

Web Title:  In the case of theft of thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.