पुन्हा कॉपी करताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:25 AM2018-03-20T00:25:12+5:302018-03-20T11:28:53+5:30
औंढा नागनाथ : येथील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर सोमवारी पुन्हा महसूल विभागाच्या पथकाने ऐनवेळी छापे मारून दोन विद्यार्थी रेस्टिकेट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर सोमवारी पुन्हा महसूल विभागाच्या पथकाने ऐनवेळी छापे मारून दोन विद्यार्थी रेस्टिकेट केले. याबाबत केंद्रावर सुधारणा होत नसतील तर संबंधित केंद्र चालकावरच कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती आहे.
औंढा नागनाथ येथे जि.प. प्रशालेत दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू झाली तेव्हापासून या केंद्रावर कॉपी (नक्कल) होत असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना मिळत आहे. त्यांनी याबाबत या अगोदर दोनवेळा महसूल पथके पाठवून कारवाई केली आहे. यामध्ये १९ मार्च रोजी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी एका विद्यार्थ्याला रेस्टिकेट केले होते. तरीही सोमवारच्या इतिहासाच्या पेपरला जि.प. परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. दुपारी पेपर संपण्याचा २० मिनिटे अगोदर तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी परीक्षा केंद्रावर तपासणी केली. यावेळी दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. यावेळी माचेवाड यांनी दोन्ही विद्यार्थ्याला रेस्टीकेट करून संबंधित अहवाल महसूल विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचना देवूनही सुधारणा होत नसेल तर केंद्र प्रमुखावरच कारवाई करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती आहे.