पतंगोत्सव साजरा करा पण....जरा जपून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:45 AM2019-01-15T00:45:41+5:302019-01-15T00:46:25+5:30
मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो, तसे बालगोपालांसह मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंग उडविण्याचे रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळच आनंद. मात्र या आनंदाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो, तसे बालगोपालांसह मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंग उडविण्याचे रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळच आनंद. मात्र या आनंदाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे याप्रसंगी जीवही गमवावा लागतो. त्यामुळेच पतंग उडविताना काही दुर्घटना होणार नाही याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षिततेचे नियम पाळूनच पतंग उडवावेत. विशेष म्हणजे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे. पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटना बातम्यांच्या स्वरुपात आपण दरवर्षी वाचतो. शहरी भागात अपुऱ्या जागेअभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेकजण दिसतात. अशावेळी अनेकांना घरावरून गेलेल्या वीजतारांचाही विसरही पडतो. खबरदारी न घेतल्यामुळे अपघात होतो. त्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही युवकांत जणू स्पर्धाच लागते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले. वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात तारेचे घर्षण होऊन शॉटसर्किटची शक्यता असते. मोकळ्या जागेतच पतंग उडवावेत व पालकांनी दक्ष राहावे. मदतीसाठी जवळील महावितरणच्या कार्यालयाशी किंवा कॉल सेंटरच्या १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-१०२-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.