कनेरगावात ट्रॅक्टर पोळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:12 AM2018-09-10T01:12:38+5:302018-09-10T01:12:44+5:30
जिल्हाभरात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात ग्रामीण भागातून दिवसभर बैलजोड्या येत होत्या. यावेळी घरासमोर सर्जा-राजाची जोडी उभी राहताच मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जात होती. हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील पोळा मारोती मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिक मोठ्या उत्साहाने पोळा सण पाहण्यासाठी एकत्रित जमले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हाभरात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात ग्रामीण भागातून दिवसभर बैलजोड्या येत होत्या. यावेळी घरासमोर सर्जा-राजाची जोडी उभी राहताच मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जात होती. हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील पोळा मारोती मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिक मोठ्या उत्साहाने पोळा सण पाहण्यासाठी एकत्रित जमले होते.
कनेरगाव नाका : हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांनी बैल पोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळा भरविला. ट्रॅक्टर पोळ्याचे हे १९ वे वर्ष आहे. शेतकºयांच्या जीवनात बैलाला फार महत्त्व आहे. शेतीची सर्वच कामे पूर्वी बैलांकडून कामे केली जात असत. परंतु आधुनिक युगात हळूहळू बैलाची संख्या कमी झाल्याने शेतकरी सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू लागला आहे. शेतातील नांगरणी, पेरणी, मळणी व इतर कामे ट्रॅक्टरवर करता येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर पोळा भरवावा, ही कल्पना २००० साली गावातील व्यापारी तथा शेतकरी स्व. शरद जोशी यांच्यासोबत डॉ. संतोष खंडुजी गावंडे तसेच स्व. आत्माराम बर्वे यांनी मांडली. नंतर ती ग्रामस्थांसमोर मांडली. सर्व ग्रामस्थांनी बैलांप्रमाणे ट्रॅक्टर पोळा भरविण्याची प्रथा सुरू केली. बैल व ट्रॅक्टर पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली उभे करून त्यांची पूजा केली जाते. या पोळ्याच्या पूजेचे मानकरी गावातील विठ्ठल मारोती गावंडे, गणेश रामेश्वर गावंडे, जगदीश प्रल्हाद गावंडे, गणेश विठ्ठल गावंडे, शिवाजी कुंडलिक गावंडे व बालाजी जयभारत गावंडे, रवि जोशी आहेत. हे मानकरी बैलांची व ट्रॅक्टरची पुजा करतात. मानकºयांच्या घरी जावून त्यांना वाजत गाजत पोळ्याच्या ठिकाणी आणले जाते व त्यांच्या हस्ते पुजा केली जाते. नंतर पोळा फुटून ट्रॅक्टर व बैलांची गावातून मिरवणूक काढली जाते. यासाठी तंटामुक्त अध्यक्ष भारत बर्वे, डॉ. संतोष गावंडे, राम पाटील, रामचंद्र गावंडे, किसन गावंडे, बाळू पाटील, गणपत गावंडे, बालाजी गलंडे, शिरीष जोशी, बालाजी गावंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.