जि.प.समोर सभापतींचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:57 PM2018-11-22T23:57:54+5:302018-11-22T23:58:23+5:30
वसमत येथील जि. प. प्रशाला मैदानावरील बाजार गाळे (शॉपींग कॉम्पलेक्स) उभारणीच्या मागणीसाठी कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती प्रल्हाद राखोंडे हे गुरुवारी उपोषणास बसले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वसमत येथील जि. प. प्रशाला मैदानावरील बाजार गाळे (शॉपींग कॉम्पलेक्स) उभारणीच्या मागणीसाठी कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती प्रल्हाद राखोंडे हे गुरुवारी उपोषणास बसले आहेत.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यापूर्वी वरील प्रश्नाबाबत निवेदन सादर केले. शिवाय वेळोवेळी जि. प. कार्यकारी समिती, सर्वसाधारण सभेतही वसमत येथील बाजार गाळ्यांचा प्रश्न मांडला होता. याच प्रश्नासाठी राखोंडे यांनी सभागत्याग केला. परंतु वसमत येथील बाजार गाळ्यांचा प्रश्न मात्र मार्गी लागला नाही. याबाबत सकारात्मक भूमिका व ठोस निर्णय घेतला जात नसल्यानेच आज उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, बीओटीवर काम घेण्याचा ठराव घेण्याच्या आश्वासनानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले.