येत्या चार दिवसांत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:55+5:302021-05-30T04:23:55+5:30

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या माहितीनुसार ३० मे रोजी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तर ३१ मे रोजी औरंगाबाद, बीड, जालना, ...

Chance of rain in all districts of Marathwada in next four days | येत्या चार दिवसांत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता

येत्या चार दिवसांत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता

Next

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या माहितीनुसार ३० मे रोजी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तर ३१ मे रोजी औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात, १ जून रोजी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच २ जून रोजी बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट होईल. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर एवढा राहण्याची शक्यता आहे.

घराबाहेर पडू नये....

आशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच झाडाच्या आडोशाला उभे राहू नये, पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये.

- डॉ. कैलास डाखोरे, मुख्य समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग, परभणी.

Web Title: Chance of rain in all districts of Marathwada in next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.