रविवारी पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:49+5:302021-06-06T04:22:49+5:30
हिंगोली: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रविवारी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तविला आहे. ...
हिंगोली: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रविवारी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तविला आहे.
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार ६ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये
तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होऊन पावसाची शक्यता आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहू शकतो. आशा परिस्थितीत नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतात झाडाच्या आडोशाला उभे राहू नये. याचबरोबर पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे. झाडाखाली किंवा उघड्यावर पशुधनास बांधू नये. चारा खाण्यासाठी पशुधनास मोकळेही सोडू नये, असे आवाहन
‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.