येत्या तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:48+5:302021-09-27T04:31:48+5:30
हिंगोली : मुुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल, असा ...
हिंगोली : मुुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार येत्या तीन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवमानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
२७ सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात, २८ सप्टेंबर रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तर २९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. पावसादरम्यान शेतकऱ्यांनी शेतातील कामे करू नयेत व झाडांच्या खाली उभे राहू नये. कारण झाडावर वीज पडण्याची दाट शक्यता असते. दुसरीकडे पाऊस सुरू असल्यास पशुधनाची काळजी घेत पशुधनाला उघड्यावर बांधू नये, असे आवाहनही ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.