सहा जिल्ह्यात वादळासह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:54+5:302021-06-28T04:20:54+5:30
हिंगोली: सोमवारी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये वादळीवारे व विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तविला ...
हिंगोली: सोमवारी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये वादळीवारे व विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तविला आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दहा-बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिके सुकून जाऊ लागली आहेत. तर काही जिल्ह्यात पावसाने थोड्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
२८ जून रोजी हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड व लातूर या ६ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडू शकतो. वादळी वारे व पाऊस या दरम्यान शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. पशुधनाला उघड्यावर तसेच पत्राच्या खोलीत बांधू नये. कारण अशा ठिाकणी धोका होण्याची शक्यता असते. तेव्हा शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन ‘वनामकृ’च्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने केले आहे.