पावसाची शक्यता; हवामान केंद्राचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:31 AM2021-02-16T04:31:06+5:302021-02-16T04:31:06+5:30
वीज खंडित; शेतकरी त्रस्त कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विहिरींना पाणी असूनही ...
वीज खंडित; शेतकरी त्रस्त
कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने वेळीच याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गतिरोधकाची मागणी
हिंगोली : तालुक्यातील डिग्रसफाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिग्रसफाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी अनेक वेळा केली आहे. परंतु, अद्यापतरी येथे गतिरोधक बसविण्यात आले नाहीत. वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन संबंधित विभागाने गतिरोधक बसवावे.
बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून येथील बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. आगारप्रमुखांनी लक्ष देऊन बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.