पावसाबरोबर वादळी वाऱ्याची शक्यता (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:22 AM2021-04-29T04:22:22+5:302021-04-29T04:22:22+5:30
हिंगोली : येत्या २ मेपर्यंत मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांत पावसाबरोबर वादळी वारा सुटेल. याचबरोबर विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज वसंतराव ...
हिंगोली : येत्या २ मेपर्यंत मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांत पावसाबरोबर वादळी वारा सुटेल. याचबरोबर विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
३० एप्रिल ते १ मेदरम्यान औरंगाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद येथे पाऊस व वादळी वारा होईल. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर एवढा राहील. २ मे रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड येथे वादळी वारा, विजांचा कडकडाट तसेच पावसाची शक्यता आहे. २ मे रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद येथे तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. येेथेही वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील, अशी माहिती ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य समन्वयक कैलास डाखोरे यांनी दिली.