महावितरणच्या ‘टोलफ्री’ क्रमांकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:35 AM2018-04-29T00:35:15+5:302018-04-29T00:35:15+5:30

वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या एका क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी नवीन क्रमांकाची दखल घेऊन वीजसेवेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन नांदेड परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 Changes to MSEDCL's toll-free number | महावितरणच्या ‘टोलफ्री’ क्रमांकात बदल

महावितरणच्या ‘टोलफ्री’ क्रमांकात बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या एका क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी नवीन क्रमांकाची दखल घेऊन वीजसेवेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन नांदेड परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना विजेसंबंधीच्या कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारींची नोंदीसाठी महावितरणने मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली. या टोल फ्री क्रमांकापैकी १८००२००३४३५ हा क्रमांक बंद करून आता त्याऐवजी १८००१०२३४३५ क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सदर माहिती यापुर्वीही कळविण्यात आली होती. परंतु अनेकांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे परत एकदा वीजग्राहकांनी सध्या अस्तित्वात असलेल्या १९१२ व १८००२३३३४३५ या क्रमांकामध्ये कुठलाही बदल करण्यात आला नसुन सध्या १९१२ व १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास कार्यरत असणार आहे. महावितरणच्या वीजबिलाची छपाई मोठया प्रमाणावर एकदाच केली जाते. त्यामुळे काही बिलांवर बंद करण्यात आलेला टोल फ्री क्रमांक आहे. त्यामुळे वीजग्राहक संभ्रमात आहेत. नव्या बदलाची नोंद वीज ग्राहकांनी घेवून आपल्या तक्रारी नवीन टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून नोंदवाव्यात.

Web Title:  Changes to MSEDCL's toll-free number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.