पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:44+5:302021-01-09T04:24:44+5:30
त्यानुसार ४ जानेवारी २०२१ च्या शासन पत्रान्वये मान्यता घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारित करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या वेळासंबंधीचे यापूर्वीचे ...
त्यानुसार ४ जानेवारी २०२१ च्या शासन पत्रान्वये मान्यता घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारित करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या वेळासंबंधीचे यापूर्वीचे सर्व आदेश, परिपत्रके रद्द करण्यात आली. सुधारित कामकाजाच्या वेळा खालीलप्रमाणे कटाक्षाणे अमलात याव्यात. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये, असे पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी कळविले आहे.
सुधारित वेळेतील बदल पुढीलप्रमाणे आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत राहील. यामध्ये जेवणाची सुटी दुपारी १ ते १.३० अशी असेल. तर शानिवार रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत वेळ असेल. ही वेळ ही पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १, श्रेणी-२, ता.ल.प.स.व.चि. (सर्व), जि.प.स.चि. (सर्व), फिरते पशुवैद्यकीय दवाखाने यांना लागू राहील. तसेच पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी २४ तास सदैव सेवा उपलब्ध राहणार आहे. तर कार्यालयात काम करणाऱ्या चतुश्रेणी कर्मचाऱ्यांना सेवा सकाळी कामाच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर व संध्याकाळी अर्धा तास उशिरा जादा राहतील, असेही पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.