मोक्कातील सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:38+5:302021-06-01T04:22:38+5:30
शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या ...
शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केला. यात कैलास सुभाष मनोबलकर (वय २७, रा. गाडीपुरा), भागवत बाबाराव बांगर (वय २१, मंगळवारा), लक्ष्मण विलास नागरे (वय ३३, रा. खेड), यांना या गुन्ह्यात फेरअटक करून तपास करण्यात आला. तर यातील फरार आरोपी नगरसेवक नाना ऊर्फ नरसिंग नायक, रा. तापडिया इस्टेट, राजकुमार ऊर्फ राजू विलास नागरे, रा. तापडिया इस्टेट, बालाजी नारायण सांगळे, रा. पोळा मारोती वंजारवाडा यांच्याविरुद्ध पुरावा हस्तगत केला. या आरोपींविरुद्ध दोषारोप दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यात आता दोषारोप दाखल करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. यातील काही आरोपी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नरत होते; मात्र त्याची आशा संपुष्टात आल्यात जमा आहे.
यातील कैलास मनबोलकर, भागवत बांगर, लक्ष्मण नागरे हे सध्या अटकेत असून मोक्काअंतर्गत परभणी कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तर नाना नायक, राजू नगरे व बालाजी सांगळे या तीन आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. पोलीस त्यांच्या मागावर आहेत, असे अधीक्षक कलासागर यांनी सांगितले.