योजनेच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:49 PM2017-12-04T23:49:45+5:302017-12-04T23:49:53+5:30

शहरासह ग्रामीण भागात बेटी पढाओ, बेटी बचाओ अभियान अंतर्गत अर्ज भरून घेतले जात आहेत. तसेच बँक खात्यावर ३ लाख रूपये रक्कम जमा होईल, अशा प्रकारचे अर्ज भरून घेतले जात आहेत, शिवाय अनेक झेरॉक्स मशिन तसेच दुकानांवरही अर्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे अशी कुठलीही शासनाची योजना नसून नागरिकांनी अर्ज भरून देऊन नयेत. फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) गणेश वाघ यांनी केले.

Cheating in the name of the scheme | योजनेच्या नावाखाली फसवणूक

योजनेच्या नावाखाली फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगोली : फसवणूक होत असल्यास कार्यालयाशी संपर्क करा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरासह ग्रामीण भागात बेटी पढाओ, बेटी बचाओ अभियान अंतर्गत अर्ज भरून घेतले जात आहेत. तसेच बँक खात्यावर ३ लाख रूपये रक्कम जमा होईल, अशा प्रकारचे अर्ज भरून घेतले जात आहेत, शिवाय अनेक झेरॉक्स मशिन तसेच दुकानांवरही अर्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे अशी कुठलीही शासनाची योजना नसून नागरिकांनी अर्ज भरून देऊन नयेत. फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) गणेश वाघ यांनी केले.
अर्जासोबत, संमतीपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड कागदपत्रे जोडली जात आहेत. सदर अर्ज हिन्दी भाषेत असून यावर संपूर्ण माहिती भरली जात आहे. परंतु सदर योजनेखाली अशा प्रकारची कुठलेही अर्ज हिंगोली जिल्ह्याकरिता कार्यालयाकडून मागविण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी, अफवांवर विश्वास न ठेवता अशा प्रकारचे कुठलेच अर्ज भरून न देण्याचे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारच्या अर्ज विक्री करणाºयांवर तसेच माहिती भरून घेणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. किंवा याबाबत काही माहिती मिळाल्यास, तसेच अर्ज कोणी भरून मागत असेल तर, त्याची माहिती महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद कार्यालयास देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Cheating in the name of the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.