चेक बाऊन्स; दंडाच्या रकमेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:40 AM2018-10-26T00:40:04+5:302018-10-26T00:40:40+5:30

वेळ मारुन नेण्यासाठी धनादेशाचा वापर करणे वीजग्राहकांना आता परवडणार नाही. कारण वीजबिलापोटी दिलेला धनादेश (चेक) बाऊन्स झाल्यास संबधितास ५९० रुपयांचा दंड बसणार आहे. शिवाय पुढील सहा महिने धनादेश स्विकारला जाणार नाही.

 Check bounce; Increase in penalties | चेक बाऊन्स; दंडाच्या रकमेत वाढ

चेक बाऊन्स; दंडाच्या रकमेत वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वेळ मारुन नेण्यासाठी धनादेशाचा वापर करणे वीजग्राहकांना आता परवडणार नाही. कारण वीजबिलापोटी दिलेला धनादेश (चेक) बाऊन्स झाल्यास संबधितास ५९० रुपयांचा दंड बसणार आहे. शिवाय पुढील सहा महिने धनादेश स्विकारला जाणार नाही. तसेच पुनर्रजोडणी आकारतही वाढ झाली आहे. मात्र आॅनलाईन वीजबिलांचा भरणा वाढण्यासाठी १ सप्टेंबरपासून पाव (०.२५ %) टक्याची सूट दिली जात आहे.
दरमहा येणारे वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. राज्यातील केवळ १४ टक्के ग्राहक आॅनलाईनद्वारे वीजबिल भरतात. तर उर्वरित वीजबिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहून रोखीने किंवा धनादेशाने वीजबिल भरतात. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात महसूलात आर्थिक शिस्त येण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. चेक बाऊन्ससाठी पूर्वी ३५० रुपये असलेला दंड आता ५०० रुपये केला आहे. त्यावर १८ टक्के जीएसटी असे मिळून ५९० रुपये भुर्दंड चेक बाऊन्स झालेल्या वीजग्राहकांना बसणार आहे. तसेच पुढील सहा महिने त्यांचा धनादेश स्विकारला जाणार नाही. तर वारंवार कल्पना देऊनही वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जातो. हा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नवीन आदेशानुसार सिंगल फेजला १०० रुपये व थ्री फेजला २०० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.
ग्राहकांना विजेच्या सर्व सेवा मोबाईल अ‍ॅपवर व महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. राज्यातील ३२ लाखांहून अधिक ग्राहक मोबाईल अ‍ॅपचा वापर करत आहेत. नांदेड परिमंडलातील ग्राहकांनीही आॅनलाईन सेवांचा वापर वाढवला आहे. माहे एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ९४ कोटी ४५ लाख रूपयांचा वीजबील भरणा आॅनलाईन स्वरूपात केला आहे.
यामध्ये ५८ कोटी ७१ लाख रूपयांचा सर्वाधिक भरणा नांदेड जिल्हयातील वीजग्राहकांनी केला. तर परभणी जिल्हयातील ग्राहकांनी १९ कोटी ३४ लाख तसेच हिंगोली जिल्हयातील ग्राहकांनी १४ कोटी ४ लाख रूपयांचा भरणा केला आहे. वेळ, श्रम व पैसा वाचवणारा आॅनलाईन पर्याय जास्तीत जास्त वीजग्राहकांनी स्विकारुन आपले वीजबिल वेळेत भरावे व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी चालू वीजबिलासह सर्व थकबाकी याच महिन्यात वसूल करण्यासाठी महावितरणने मोहीम आखली आहे. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीसह चालू वीजबिलाचा भरणा करावा असे आवाहन करण्यात आले.

Web Title:  Check bounce; Increase in penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.