चेक दिला पण खात्यात पैेसे कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:14 AM2018-05-10T01:14:29+5:302018-05-10T01:14:29+5:30
जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने अधिग्रहण करताना संबंधित शेतकºयांना त्या-त्या महिन्यात त्याचा मोबदला दिला जात नाही. टंचाईचा काळ संपल्यानंतर एकत्रित देयके सादर करण्यात येतात. मात्र त्यातही काही पंचायत समित्यांची दप्तर दिरंगाई सुरू असते. त्यामुळे शेतकºयांनी कधीच वेळेत ही रक्कम मिळत नाही. गेल्यावर्षीची रक्कम मिळाली नसल्यान जि.प.च्या मागील काही सभांमध्ये हा मुद्दा गाजला. त्यानंतर जि.प.च्या पाणीपुरवठा व अर्थ विभागाने ही रक्कम अदा करण्यात येईल, असे सांगितले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसºया वर्षीचा म्हणजे यंदाचा टंचाईचा काळ सुरू झाल्यानंतर जि.प.ने जवळपास ६0 ते ७0 शेतकºयांची खाते क्रमांकासह यादी व ५८ लाखांचा धनादेश स्टेट बँक आॅफ इंडियाकडे पाठविला. २३ एप्रिलला ही कार्यवाही करण्यात आली होती. सदर शेतकºयांनाही याबाबतची माहिती दिली जात होती. त्यामुळे शेतकरी मध्यंतरीच्या सुट्यांनंतर दररोज बँकेचे खेटे घालत आहेत. मात्र रक्कमच जमा झाली नसल्याचे त्यांना सांगितले जात होते.
शेतकरी : पंचायत समित्यांची दफ्तरदिरंगाई
काहींनी स्टेट बँक आॅफ इंडियात चौकशी केल्यावर अजून खात्यात रक्कमच टाकली नसल्याचे सांगण्यात येत होते. जेव्हा शेतकºयांनी दबाव आणला तेव्हा ७ मे रोजी ही रक्कम वर्ग करू, असे सांगण्यात आले होते. तरीही न झाल्याने मंगळवारी पुन्हा
शेतकरी बँकेत गेले तर जि.प.ने ज्या खात्याचा धनादेश दिला, त्यातच रक्कम नसल्याचे समजले. त्यामुळे टंचाईच्या काळात मदत करणाºया शेतकºयांची चेष्टा चालविली की काय? असा सवाल केला जात आहे.