हिंगोलीत छत्रपती संभाजी राजे जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:29 AM2021-05-16T04:29:01+5:302021-05-16T04:29:01+5:30
अध्यक्षस्थानी बळसोंड येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील, ...
अध्यक्षस्थानी बळसोंड येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील, ॲड. रमेश शिंदे , शिक्षक माधव कोरडे, भानुदास लिंबूळे पाटील, पांडुरंग कोरडे पाटील, एस.आय शिंदे, डॉ. शिरीष वाढवे, संदीप काळे, जैस्वाल उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच गीतांजली पार्कच्या मोकळ्या जागेत वाचनालय व अभ्यासकेंद्र उभारण्याचा यावेळी युवकांनी संकल्प केला. यात संभाजी राजे यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांसह सर्वच समाजासाठी उपयुक्त ठरतील अशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला.
मुख्याध्यापक टी.एम. पोघे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. कृष्णा इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पदमानंद सोनकांबळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गीतांजली पार्क, रामकृष्ण रेसिडेन्सी, सीताराम नगरी व रामनगरातील अमोल शेळके, सचिन तपासे, सिद्धांत धुळे, प्रवीण जाधव, योगेश शर्मा, अतुल शेळके, आशिष राऊत, सिद्धार्थ खिल्लारे, सिद्धार्थ केशवे, साहेबराव कळंबे, आनंद साळवे, प्रतीक हनवते, गजानन साळवे, सागर रोठे, जयकुमार इंगोले, सिद्धार्थ बगाटे, संतोष पवार आदींनी पुढाकार घेतला.
फोटो : ३२