मुख्याधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यात टिपले विविध प्रजातींचे पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:29 AM2021-05-23T04:29:01+5:302021-05-23T04:29:01+5:30
मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना पूर्वीपासूनच पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. सुट्टीच्या दिवशी वेळ काढून ते तलाव, पाणवठे, माळरानांवर पक्षी ...
मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना पूर्वीपासूनच पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. सुट्टीच्या दिवशी वेळ काढून ते तलाव, पाणवठे, माळरानांवर पक्षी निरीक्षणासाठी जातात. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत पक्ष्यांची ओळख पटविणे, नोंदी घेणे आदी उपक्रम राबवितात. हिंगाेली शहरातील चिराग शाह बाबा दर्गा परिसरात निसर्गरम्य वातावरण व पक्ष्यांचा किलबिलाट दिसताच डॉ. कुरवाडे यांनी वाहनातील कॅमेरा काडून पक्ष्यांच्या हालचाली टिपण्यास सुरवाात केली. त्यांना या ठिकाणी धान तिरचिमणी, घोलर टीलवा, मोठा बगळा आदी जवळपास वीस ते पंचवीस प्रजातीचे पक्षी आढळून आले. पक्षीप्रेमी व निसर्गसंवर्धनाविषयी चांगला अभ्यास असल्यानेच त्यांना
माझी वसुंधरा अभियानांतर्गत भरीव काम करता आले. त्यांनी तयार केलेल्या रोपवाटिकेत व शहरातही बहुतांश झाडावर पाण्याची व्यवस्था करून दिली आहे.
फोटो न. १६