मुलगा नसलेल्या मातेने दोन मुलींसह जीवन संपविले

By admin | Published: May 3, 2017 03:15 AM2017-05-03T03:15:50+5:302017-05-03T03:15:50+5:30

मुलगा नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत छळाला कंटाळून येथील २६ वर्षीय महिलेने दोन मुलींना गळा दाबून

A child without a mother has lost life with two girls | मुलगा नसलेल्या मातेने दोन मुलींसह जीवन संपविले

मुलगा नसलेल्या मातेने दोन मुलींसह जीवन संपविले

Next

सवना (जि. हिंगोली) : मुलगा नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत छळाला कंटाळून येथील २६ वर्षीय महिलेने दोन मुलींना गळा दाबून मारल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.
आरती प्रवीण नायक (२६) हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी प्रवीण नागोराव नायक यांच्यासोबत झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. १ मे रोजी संत बैरागी बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले होते. नायक कुटुंबातील सर्वजण महाप्रसादाला गेले होते. ते घरी आल्यावर त्यांना आरतीने गळफास घेतलेला आढळले. पलंगावर पूर्वी (४) व किरण (२) या दोन्ही मुलींचा मृत अवस्थेत होत्या.
आरती यांच्या माहेरच्या मंडळींना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: A child without a mother has lost life with two girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.