हळदीच्या सरीसाठी मुलांनाच जुंपले कोळप्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:00+5:302021-06-17T04:21:00+5:30

हिंगोली: अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे बैल घेणे महागाईच्या काळात परवडत नाही. खरिपाचा हंगाम हातचा जाईल, या भीतीने चोंडी परिसरातील एका ...

The children jumped for the yellow sari | हळदीच्या सरीसाठी मुलांनाच जुंपले कोळप्याला

हळदीच्या सरीसाठी मुलांनाच जुंपले कोळप्याला

googlenewsNext

हिंगोली: अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे बैल घेणे महागाईच्या काळात परवडत नाही. खरिपाचा हंगाम हातचा जाईल, या भीतीने चोंडी परिसरातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या मुलांनाच औताला जुंपले आहे.

औंढा तालुक्यातील चोंडी (शहापूर) येथील शेतकरी हिरामन निवृत्ती कठाळे यांना पाच एकर शेती आहे. मात्र तरीही त्यांना शेतीची आर्थिक गणित कधी जुळले नाही. यावर्षी नगदी पीक म्हणून हळदीकडे लक्ष वेधले आहे. परंतु, मध्यंतरी पावसाने चांगली हजेरी दिल्यामुळे बैल रोजंदारीने मिळणे कठीण झाले आहे. ते मिळाले तरीही हजार रुपये रोजंदारी अर्थात भाडे मोजावे लागेल. तर कठाळे हे बैल विकत घेऊ शकत नाहीत. किमान लाख रुपये तरी बैलजोडीसाठी लागतात. मागच्यावर्षी बैलाअभावी खरीप हंगाम असाच हातातून गेला होता. त्यावेळसही बैल भाडे तत्त्वावर आणले होते. गतवर्षी अतिवृष्टीने खरिपातील मूग, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे हाती पैसे नाहीत. हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरने नांगरटी केली. मात्र पुढील लागवड ही बैलजोडीशिवाय करणे शक्य नव्हते. तर बैल मिळत नव्हते. हंगाम हातचा जावू नये म्हणून दोन्ही मुलांशी चर्चा केली. दोन्ही मुलांनी होकार देताच त्यांच्या खांद्यावर जू ठेवून शेतात हळद लागवडीसाठी कोळप्याच्या साह्याने सरी पाहण्यास सुरुवात केली आहे. यानंतर या नांगरलेल्या शेतात हळद घेण्याचे ठरविले.

दरवर्षी रोजमजुरीने बैल घेऊन करतो शेती

पोटाला अन्न मिळेल एवढी शेती आहे. अल्पभूधारक असल्यामुळे लाखापेक्षा जास्त रक्कम मोजून बैलजोडी खरेदी करण्याची ऐपत नाही. त्यात महागाईने कळस गाठला आहे. भाडेतत्त्वावरही बैल घेणे परवडत नाही. खरीप हंगाम हातचा जाईल म्हणून नांगरणी करण्याचे ठरविले. मुलांना विचारले तर बैल भाड्याने अथवा रोजंदारीने घेणे आपल्याला परवडत नाही. तेव्हा जर तुम्ही साथ दिली तर आपल्याला हळद लावता येईल. मुलांनीही आज्ञा पाळत होकार दिला. चक्क औताचे जू खांद्यावर घेऊन १६ जूनपासून हळद लागवडीचे काम हाती घेतले आहे.

-हिरामन कठाळे, शेतकरी

फोटो नंबर ७

Web Title: The children jumped for the yellow sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.