चुलीवरच शिजते बिरबलाची खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:33 AM2019-01-04T00:33:02+5:302019-01-04T00:33:23+5:30

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणार शालेय पोषण आहार अजूनही चुलीवरच शिजत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८८२ पैकी केवळ १० शाळांमध्येच कीचनशेड उपलब्ध नाही. असे असले तरी केवळ २० ठिकाणी गॅस सुविधा उपलब्ध आहे, हे विशेष.

 Chillipatra cooked birbala khichdi | चुलीवरच शिजते बिरबलाची खिचडी

चुलीवरच शिजते बिरबलाची खिचडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणार शालेय पोषण आहार अजूनही चुलीवरच शिजत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८८२ पैकी केवळ १० शाळांमध्येच कीचनशेड उपलब्ध नाही. असे असले तरी केवळ २० ठिकाणी गॅस सुविधा उपलब्ध आहे, हे विशेष.
सरपणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी यासाठी शासनाकडून विविध योजनेअंतर्गत गॅस उपलब्ध करून दिला जात आहे. परंतु राज्यभरातील शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार चुलीवरच शिजविला जातो. चुलीवर स्वयंपाक केल्याने धुरामुळे फुफ्फुसाचे आजार जडतात. त्यामुळे शासनाकडून धुरापासून महिलांना मुक्त करण्यासाठी गॅस वाटप केले जात आहेत. तर दुसरीकडे पोषण आहाराची खिचडी चुलीवरच शिजविली जात असून इंधनाचा खर्चही संबधित शाळांना दिला जातो. शाळेच्या प्रांगणात चुलीवर खिचडी शिजविली जात असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांनाही धुराचा त्रास सहन करावा लागतो. परिणामी विद्यार्थी व स्वयंपाकी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील ८८२ शाळांतून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. आहार शिजविण्यासाठी शाळेच्या ठिकाणी कीचनशेडही उपलब्ध आहेत. केवळ दहा ठिकाणी कीचनशेड उपलब्ध नाहीत. वसमत येथील २ शाळांत तर कळमनुरी येथील ५ शाळेत तसेच औंढा नागनाथ २ व सेनगाव येथील एका शाळेत कीचनशेड उपलब्ध नाही. मात्र कीचनशेडमध्ये हवी तशी आवश्यक सुविधा नाहीत. अनेक किचनशेड जीर्णावस्थेत आहेत. काही ठिकाणी पाणी उपलब्ध नसते. या कारणांमुळे स्वयंपाक करणाऱ्या महिलांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागते
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शिक्षण खात्याच्या संबधित विभागाकडे कोणतीच आकडेवारी उपलब्ध नसते. वरिष्ठ अधिकाºयांनी एखाद्या कामी जर आकडेवारी मागितल्यास ऐनवेळी कर्मचारी धावपळ करतात. वेळोवेळी सूचना देऊनही संबधित विभाग मात्र वरिष्ठांच्या सूचनेकडे लक्ष देण्यास तयार नाही, हे विशेष. शिक्षणाधिकारी कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे डायटचे प्राचार्य गणेश शिंदे यांच्याकडे सध्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला आहे.
जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेची प्रभाविपणे अंलबजावणी होताना दिसून येत नाही. शिवाय संबंधित गावातील पालकांच्या तशा तक्रारीही आहेत.

Web Title:  Chillipatra cooked birbala khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.