‘त्या’ चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:00 AM2018-06-03T00:00:01+5:302018-06-03T00:00:01+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे सालगडी म्हणून असलेल्या संतोष बिलोरकर यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली होती.

 'That' chimukuli's condition is out of danger | ‘त्या’ चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर

‘त्या’ चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे सालगडी म्हणून असलेल्या संतोष बिलोरकर यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली होती.
द्रौपदी असे चिमुकलीचे नाव आहे. संतोष बिलोरकर हे मूळचे बामणी येथील असून, ते कामानिमित्त आपल्या कुटुंबियासोबत लाख येथे सालगडी म्हणून राहत आहेत. ते शेतातच वास्तव्यास असल्याने त्यांची पत्नी शेतमालकाच्या घरात राहण्याची व्यवस्था करत होती. दरम्यान, तिने आपली चिमुकली बाहेर बाजेवर ठेवून घराची साफसफाई करीत होती. तिथे आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने द्रौपदीवर हल्ला करीत तिचे लचके तोडत असल्याने द्रौपदी जोराने किंचाळली. तर बाजूलाच असलेली तिच्या बहिणीने आईला जोरजोरात आवाज देऊन ‘ आई, आपल्या बाईला कुत्रा ओढून नेत आहे’, असे रडत सांगत होती. दरम्यान, आई धावत आली आणि तिने कुत्र्याच्या तावडून चिमुकलीला सोडविले. दरम्यान चिमुकलीच्या डोळ्याचे, हाताचे व मांडीचे लचके तोडले होते. चिमुकलीला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविले. चिमुकलीवर डॉ.नितीन अग्रवाल, डॉ. विनोद बीडकर यांनी उपचार केले. तर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. एक ते दोन दिवसांत उपचार पूर्ण करून तिला सुटी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  'That' chimukuli's condition is out of danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.